शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

ऊसदराची कोंडी कायम, बैठक फिस्कटली : सदाभाऊंचा आग्रह नडला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:41 IST

मुंबई / कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली.

ठळक मुद्देसरकार ‘एफआरपी’वर, संघटना जादा उचलीवर ठामशेतकºयांच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढू शकतो, असे खोत यांना खा. राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विरोधकांना दाखवून द्यायचे होते. महाराष्ट्रात तो कमी सांगितला जातो. आम्ही हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकºयांना आत्महत्या करायला लावू नका, असे रघुनाथ पाटील

अतुल कुलकर्णी/ विश्वास पाटील।मुंबई / कोल्हापूर : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ऊसदरासंबंधी मुख्य सचिवांची बैठक होण्याआधीच ही बैठक का घेतली, अशी विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाने केल्याचे समजते.

‘एफआरपी’ हीच पहिली उचल, अशी राज्य सरकारची ठाम भूमिका आहे. त्यामुळे वाढीव उचल देता येणार नसल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले, तर वाढीव उचल दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला. त्यामुळे राज्यातील ऊसदर आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.या बैठकीस साखर संघाचे प्रतिनिधी जयप्रकाश दांडेगावकर, संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील, वजन-काटे विभागाचे महासंचालक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, सकल ऊस परिषदेचे दादा काळे, अनिल घनवट, आदी उपस्थित होते.

मागच्या हंगामातील ऊसदराचाअंतिम बिलाचा निर्णय घेण्यासाठीऊसदर नियंत्रण समितीची बैठक  येत्या बुधवारी (दि. ८) मुंबईत होत आहे. मात्र तत्पूर्वीच बैठक घेण्याच्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आग्रहामुळे सरकार पुन्हा तोंडघशी पडले. शेतकरी संपातही खोत यांनी केलेली हातघाई सरकारच्या अंगलट आली होती. शेतकºयांच्या प्रश्नावर आपणच तोडगा काढू शकतो, असे खोत यांना खा. राजू शेट्टी यांच्यासह त्यांच्या विरोधकांना दाखवून द्यायचे होते. आज झालेल्या बैठकीत खा. शेट्टी यांनी उसउत्पादक शेतकºयांना ३४०० रुपयांची पहिली उचल दिलीच पाहिजे, असा आग्रह कायम ठेवला. तर राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी बँका जर शेतकºयांना २९०० ते ३००० ची उचल देत असतील तर शेतकºयांना ३५०० रुपये कसे देणार? असा सवाल उपस्थित केला.गुजरात आणि इतर राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार असताना एफआरपीला चांगला भाव मिळतो. महाराष्ट्रात तो कमी सांगितला जातो. आम्ही हक्काचे पैसे मागत आहोत. ऊस शेतकºयांना आत्महत्या करायला लावू नका, असे रघुनाथ पाटीलप्राप्तीकरवाल्यांना आवरा!जे साखर कारखाने एफआरपीपेक्षा जास्त भाव देतात, त्या जास्तीच्या रकमेला नफा समजून प्राप्तीकरवाले नोटीसा पाठवतात. गेल्यावर्षी राज्यातील कारखान्यांना ५ हजार कोटींचा टॅक्स भरण्याच्या नोटीसा दिल्या गेल्या. त्यापोटी ‘अंडरप्रोटेस्ट’ १ हजार कोटी रुपये कारखान्यांनी भरले. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे ,अशी मागणी दांडेगावकर यांनी केली.एफआरपी नुसार दर दिला पाहिजे हे कायद्याचे बंधन आहे. यावर्षी ९.५ टक्के उतारा असणाºयांना २५५० व नंतरच्या प्रत्येकी १ टक्क्याला २६८ रुपये भाव आहे. ज्या ठिकाणी जसा उतारा तशी एफआरपी होईल. गेल्यावर्षी हाच दर ९.५ टक्क्याला २३०० रुपये व नंतरच्या प्रत्येकी १ टक्क्याला २४२ रुपये होता.

तो निर्णय मुख्यमंत्री घेतील!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत आपल्या राज्यातील ऊस परराज्यात पाठविण्यावर बंदी घातली आहे. जर अन्य राज्यात आम्हाला चांगला भाव मिळत असेल तर त्यासाठी राज्यबंदी घालून अडवणूक का करता? असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी केला. त्यावर ही मागणी मुख्यमंत्र्यांशी बोलून सोडवू, असे आश्वासन सहकारमंत्र्यांनी दिले. 

यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल. शेतकरी व साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय ठेवून हिताचे निर्णय घेण्यात येतील. दुसºया उचलपासून परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव दिला जाईल. कारखान्यांच्या वजनकाटे तपासणीसाठी जिल्हास्तरावर नेमण्यात येत असलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा सुध्दा समावेश करण्यात येईल.- सुभाष देशमुख, सहकारमंत्री